राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथील प्रा. प्रमोद मधुकर जाधव हे नुकत्याच घेण्यात आलेल्या सी.एस.आय.आर नेट – जे.आर.एफ या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत संपुर्ण भारतात १०५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
या अगोदरही प्रा. जाधव यांनी आय.आय.टी पवई (सन२०२१), आय.आय.टी खरागपुर (सन२०२२) आणि आय.आय.टी कानपूर (सन २०२३) यांच्या गेट परीक्षेत सलग तीन वेळा यश संपादन केले आहे. महाराष्ट्र सेट परीक्षेतही त्यांनी यश मिळविलेले आहे. प्रा. जाधव हे सध्या राजर्षी शाहू महाविद्यालय, देवळाली प्रवरा येथे रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सर्वसामान्य कौटुंबिक परिस्थितीतूनही बुद्धीच्या बळावर त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल रसायनशास्त्रज्ञ डाॅ. दिनेश सावंत, कॅन्सरतज्ञ डॉ. सतिश सोनवणे, प्राचार्या. स्वाती हापसे, डाॅ. संभाजी पठारे, प्राचार्य रजनीश बार्नाबस, प्रा. संदीप रोहोकले, निलेश पटेकर, ओंकार बनकर, कल्पेश खुडे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सहकारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a reply