राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : शनिवारी दिनांक ५ ऑगस्ट रोजी राहुरीत आयोजित केलेल्या सकल हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीत सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे
मोर्चात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे सदर मोर्चा वाय एम सी ए मैदान येथून सुरू होवून शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक, शनी चौक मार्गे पृथ्वी काॅर्नर येथे येऊन या ठिकाणी सभेने सांगता होणार आहे वाय एम सी ए मैदान हे महामार्गालगत असून मोर्चाकरीता येणारी वाहने महामार्गालगत पार्किंग होणार आहेत त्यामुळे महामार्गालगत मोठी गर्दी होणार असून वाहतूक कोंडी होण्याची तसेच महामार्गावरील वाहनांचा मोर्चातील नागरिकांना धक्का लागून अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून त्याचप्रमाणे मोर्चाची सांगता झाल्यानंतर परत जाणारे मोर्चेकरी व त्यांची वाहने यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने या कालावधीत नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक असल्याने या महामार्गावरील वाहतुक शनिवारी दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत वळविण्यात आली आहे.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे अहमदनगरहून राहुरी मार्गे शिर्डी, मनमाड कडे जाणारी अवजड वाहने नगर-विळद बायपास-दुध डेअरी चौक-शेंडी बायपास-नेवासा-श्रीरामपूर बाभळेश्वर मार्गे शिर्डी मनमाड अहमदनगर कडून राहुरी मार्गे शिर्डी मनमाड कडे जाणारी हलकी वाहने शिंगणापूर फाटा-सोनई-घोडेगाव – नेवासा-श्रीरामपूर-बाभळेश्वर मार्गे शिर्डी मनमाड शिर्डी मनमाड कडून राहुरी मार्गे अहमदनगर कडे जाणारी सर्व वाहने शिर्डी मनमाड मार्गे बाभळेश्वर-श्रीरामपूर – नेवासा मार्गे अहमदनगर यात मोर्चातील वाहने, शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन व स्थानिक अत्यावश्यक कारणासाठी परवानगी दिलेली वाहने सुरू राहणार असल्याची माहिती अहमदनगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे
राहूरीतील जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीत बदल

0Share
Leave a reply