इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : मागील ७० तासापासून NDRF, पोलीस, वरिष्ठ अधिकारी, पोलकेन मशीन, जेसीबी मशीन,नागरिकांकडून चालू असलेले मदत/शोध मोहीम पूर्ण झाली असली तरी ती निराशाजनक झाली आहे कारण ४ ही कामगारांचा मृत्यू झाला.
म्हासोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधकाम चालू असताना अचानक रिंगचा काही भाग, मुरूम माती खाली घसरली व त्याखाली काम करत असणारे ४ मजूर ढिगाखाली दाबली गेली आणि हे सर्व निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी घडले असल्यामुळे ही घटना घडली आहे ही हे समजण्यासाठी काही तास गेले कारण याठिकाणी या ४ कामगारा शिवाय कोणी नव्हते.
संध्याकाळ झाली पण हे कामगार घरी आले नाही म्हणून घरच्यांनी शोधा शोध केली आणि हा शोध ते काम करत असलेल्या विहिरी जवळ येऊन थांबला कारण याठिकाणी आल्यावर त्यांना कळले की विहिरीचा काही भाग खाली घसरला आहे. कामगाराच्या नातेवाईकांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना घटनेची माहिती दिली व आमदार साहेबांनी लागलीच कार्यकर्त्यांना याकामासाठी पाठवले त्यांनी पोकलेन मशीन मागवून काम चालू केले तोपर्यंत आमदार साहेबांनी शासकीय यंत्रणेला कळवून मदत पोहचेल याची जबाबदारी घेतली ते सतत कार्यकर्ते व अधिकारी यांच्या संपर्कात होते व पहाटे घटनास्थळी पोहोचले ते त्याठिकाणी स्थळ ठोकून बसले होते त्यांनी यावेळी अधिकारी व नातेवाईक यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजवर्धन पाटील यांनी घटना ठिकाणी येऊन पाहणी केली व नातेवाईक यांच्याशी चर्चा केली.
यावेळी परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तीनी येऊन मदत/शोध कार्याची पाहणी केली. यावेळी मदत व शोध कार्यात शासकीय यंत्रणा यात पोलिस, NDRF, ७ पोकलेन मशीन, जेसीबी मशीन, २ मोठे हायवा, याभागातील स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदाय यांच्या साहाय्याने सलग ७० तास मदत व शोध मोहीम चालू होती.
आज साधारण दुपारी दोन वाजता चार ही कामगाराचे मृतदेह NDRF च्या जवानांनी विहिरीतून वर काढून ॲम्बुलन्स मध्ये ठेवले व पुढील कार्यवाही साठी शासकीय अधिकारी निघणार त्यावेळी कामगाराच्या नातेवाईकांनी ठिय्या ॲम्बुलन्सच्या पुढे बसले यावेळी नातेवाईक यांची मागणी होती की या घटनेत जबाबदार विहीर मालक, रिंगचे काम करणारा ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी तसेच मृताच्या नातेवाईकांना योग्याती मदत मिळावी यावर महसूल अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांनी यांनी चर्चेअंती मार्ग काढला.
इंदापूर तालुक्याचे आमदार यांनी चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या घटनेचे पॉईंट ऑफ इमर्जन्सी उपस्थित केली मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.
Leave a reply