प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अळसुंदे (ता.कर्जत) येथे कौटुंबिक कलहातून पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत फेकून दिल्याने त्या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता.६) दुपारी ही घटना घडली.अळसुंदे येथील गोकुळ जयराम क्षीरसागर याने आपल्या दोन मुलांना रागाच्या भरात विहिरीत फेकल्याने त्यांचा अंत झाला.जयराम क्षीरसागर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतुजा गोकुळ क्षीरसागर (वय ८) आणि वेदांत गोकुळ क्षीरसागर (वय ४) या बालकांचा यात मृत्यू झाला. दोन्ही बालकांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री उशिरा शीतल गोकुळ क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून पती गोकुळ जयराम क्षीरसागर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील अधिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील हे करीत आहेत.
Leave a reply