Disha Shakti

क्राईम

कासुर्डी ता. दौंड गावचे उपसरपंच दिलीप आखाडे यांची निर्दोष मुक्तता

Spread the love

कासुर्डी ता. दौंड  जि. पुणे येथील वि. का. स.सोसायटीचे निवडणुकीत स्व पॅनलचे उमेदवारांच्या विरोधात मतदान केल्याचा राग मनात ठेवून फिर्यादी नानासो वसंतराव जगताप रा.कामटवाडी यांना शिवीगाळ, मारहाण करून डोळ्याला दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोपावरून आरोपी दिलीप हरिभाऊ आखाडे व विकास नारायण आखाडे यांचे  विरुद्ध फिर्यादीने यवत पोलीस ठाण्यात भा. द. वि कलम
324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. यवत पोलिसांनी तपासाअंती दौंड कोर्टात त्या प्रमाणे चार्जशीट दाखल केले होते . परंतु पूर्व न्यायाधीश मे.पी .जी . लंबे कोर्ट यांनी आरोपींचे वकील ॲड. आर. के.भिसे यांचा पोलिसांनी चुकीचे कलम लावल्या संबंधीचा युक्तिवाद ग्राह्य धरून भा. दं.वि. 324 वगळून इतर कलमांचे आरोपीवर दोषारोप ठेवला होता.
सदर खटल्याचे कामी सरकार पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले असतानाही सरकार पक्षाला सबळ पुराव्या अभावी केस सिद्ध करता आली नाही. तसेच फिर्यादी हे आमदार गटाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे सरकार पक्षाचे पुराव्यातून सिद्ध झाले असून आरोपींना राजकीय द्वेष्यातून खटल्यात नाहक गोवले असल्याचा युक्तीवाद आरोपीचे  वकील  ॲड. आर. के भिसे यांनी केला.
सदर खटल्याचा निकाल  दि .08.08.2023 रोजी दौंड  येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जे. एस. खेडकर /गोयल कोर्ट यांनी दिला असून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
सदरील खटल्यातील आरोपी पैकी दिलीप आखाडे हे गावचे तंटामुक्तीचे त्यावेळीचे अध्यक्ष व विध्यमान उपसरपंच असल्याने दौंड तालुक्याचे पश्चिम भागातील लोकांचे लक्ष प्रथम पासूनच या खटल्याकडे लागले होते.
सदर खतटल्याचे कामकाज आरोपी तर्फे ॲड. आर. के भिसे व सहकारी ॲड. मोनिका जगताप यांनी पाहिले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!