Disha Shakti

इतर

सेल्फीचा मोह नडला ; सेल्फीच्या नादात तोल जाऊन विवाहितेचा मृत्यु

Spread the love

यवतमाळ प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : बोरी येथील नदीवरील घटना सेल्फीचा नाद कधी कोणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही. प्रशासनाने दिलेले नियम पाळणे गरजेचे असताना सुद्धा काही नागरिक फक्त सेल्फीच्या मोहापाई नियम पायदळी तुडवून आपला जीव गमावून बसतात. उमरखेड पासून 20 किलोमीटर माहेर परजना येथील माया अमोल पतंगे व माहेरचे नाव असलेल्या माया गोविंदराव सावंत ही विवाहिता काही कामानिमित्त माहेरी परजना इथे आली होती.

धोंडा असल्याने जावयाला सुद्धा परजना येथे बोलावले होते दोघांचा धोंडा सणानिमित्त मान झाल्यानंतर आज आपल्या सासरी वडगाव इथे जात असताना बोरी चातारी येथील नदीवर माया हिला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही आणि ती सेल्फी काढण्यासाठी पुलावर उभी राहिली असता तिचा तोल जाऊन ती नदीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे दोन मुली असल्याने ब्राह्मणगाव तसेच परजना परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. ही घटना वडगाव तालुका हिमायत नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने अधिकृत माहिती मिळाली नाही. तरी पोलीस तपास चालू आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!