Disha Shakti

इतर

वीज कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के पगार वाढीचा प्रस्ताव ऊर्जामंत्री फडणवीस यांना सादर

Spread the love

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : दिनांक ०८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालय मुंबई येथे वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे कार्यकारी अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे नेतृत्वात महावितरण महापारेषण महानिर्मिती कर्मचाऱ्यांचे २०२३ते २०२८ असा पंचवार्षिक पगारवाढ प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सादर करण्यात आला.

पगारवाढीची मुदत ३१/०३/२०२३ रोजी संपली असल्याने पगारवाढीची चर्चा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाच्या प्रभावी आर्थिक नियोजनाद्वारे तसेच वीज कंपन्या मधील सुधारणांमुळे वीजक्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असल्याने त्याचप्रमाणे करोणा संकट काळात वीज कर्मचारी अधिकारी अभियंते यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता संपूर्ण महाराष्ट्राला अखंडीत व दर्जेदार वीज पुरवठा करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.

या सर्व बाबीचा विचार करून वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची दिनांक ०१/०४/२०२३पासून लागू असलेली पगार वाढ मिळावी अशी भावना कर्मचारी अधिकारी अभियंते यांच्यामध्ये असल्याने संघटनेने प्रधान ऊर्जा सचिव मा. आभा शुक्ला महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्रा महापारेषण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ.संजीव कुमार महानिर्मिती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.डॉ. पी अनबलगन तसेच तिन्ही कंपनीच्या संचालक मंडळांना वेतन वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे.

मूळ पगारात ४० टक्के वेतनवाढ तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या भत्त्यांमध्ये २०० टक्के वाढ सर्व कर्मचारी अधिकारी यांचा इन्क्रिमेंट रेशो समान असावा , एक व्यवस्थापन एक गणवेश, सर्व पदांच्या मूळ वेतनात समानता, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना अधिकची वेतनवाढ, मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेणे, कर्मचाऱ्यांचे पाल्यांना सरळ सेवा भरती व शिकवू उमेदवारी यामध्ये आरक्षण,तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षणाच्या आधारावर वरिष्ठ पदांच्या संधी, कर्मचाऱ्यांचे कुटुंब यांच्या वर्षातून तीन वेळा मोफत वैद्यकीय चाचण्या, समयबद्ध पदोन्नती , रात्रपाळी भत्ता व वाहन भत्ता सर्वांना समान देण्यात यावा, विज बिल भत्ता युनिट प्रमाणे देण्यात यावा, वीज निर्मितीसाठी प्रदूषण भत्ता तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना संगणक भत्ता , तांत्रिक कर्मचाऱ्यांना विशेष भरपाई रजा २० दिवस करण्यात याव्या अशा अनेक मागण्या वेतनवाढ प्रस्तावात करण्यात आल्या ऊर्जामंत्री यांना वेतनवाढ प्रस्ताव सादर करताना संघटनेचे अध्यक्ष राजनभाई भानुशाली व सरचिटणीस मधुकर सुरवाडे उपस्थित होते.

त्याचप्रमाणे इतर वरिष्ठ अधिकारी वर्गाला प्रस्ताव सादर करताना संघटनेचे उपाध्यक्ष रमेशभाऊ गणोरकर ,कार्याध्यक्ष विनायक जाधव राजेंद्र लहाने, कोषाध्यक्ष विठ्ठल देसाई वेतनवाढ समिती सदस्य संयुक्त सरचिटणीस पांडुरंग गायके ,केंद्रीय सचिव विजय शास्त्रकार, उपसरचिटणीस राहुल बेले ,संयुक्त सरचिटणीस चंद्रशेखर खर्डीकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष व अध्यक्ष यांनी व नांदेड परिमंडळाचे झोनसचिव विजय रणखांब यांनी वेतनवाढ प्रस्ताव दर्जेदार व दूरदृष्टी संकल्प ठेवून बनवल्याबद्दल वेतनवाढ समितीचे अध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस मधुकर सुरवाडे यांचे यावेळी कौतुक केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!