शेख युनूस / अ.नगर प्रतिनिधी : पत्रकार संदीप महाजन यांच्यावर दोन दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्याचा राहूरी तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देऊन या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. सविस्तर माहिती अशी की ( जळगांव )जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर बुधवारी भ्याड हल्ला करण्यात आला असून अतिशय अर्वाच भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचा रिकॉर्ड समोर आला आहे.
एक आमदार लोकप्रतिनिधी किशोर पाटील यांनी एका पत्रकारला नव्हे तर संपूर्ण पत्रकारितेला गालबोट लावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात नी. शब्द झाला असून एक आमदार एवढी शिवराळ भाषा कशी वापरू शकतो असा प्रश्न अख्या महाराष्ट्र देशाला पडला आहे. किशोर पाटील यांनी शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी पत्रकार संदीप महाजन यांना दिल्याने पत्रकार क्षेत्रात संताप जनक वातावरण निर्माण झाले असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला हा आमदार किशोर पाटील यांच्यातील संपर्कातील गुंडानी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.हल्ल्यातील आरोपी आणि किशोर पाटील यांचे मोबाईल संभाषण तपासले तर या मागील हल्याचा तपास पूर्णतः आमदार किशोर पाटील यांचा कट असून खरा गुन्हेगार समोर येईल.संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा सकोल तपास करून कठोर शिक्षा करण्यात यावी आणि पत्रकार संरक्षण समिती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार रमेश बोरुडे, विनीत धसाळ, रियाज देशमुख, गणेश विघे, मनोज साळवे, युनूस शेख, गोविंद फुणगे, संतोष जाधव, आकाश येवले, अशोक मंडलिक आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्याचा राहूरी तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध

0Share
Leave a reply