Disha Shakti

शिक्षण विषयी

शिंगवे नाईक मध्ये कृषी कन्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनूस : अ. नगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. विखे पाटील कृषी‌ महाविद्यालय, विळद घाट येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी शिंगवे नाईक येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले. ह्या कृषी कन्या ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी येथे आल्या आहे.

कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे यांच्या‌‌ मार्गदर्शनाखाली कृषी कन्या दहिफळे ऋतुजा, जाधव कोमल, जावळे रोहिणी ,अडसूरे ज्ञानेश्वरी, आहेर उन्नती, गायमुखे सेरेना हे येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषी कन्या पुढील दहा आठवड्याच्या कालावधीत शेतकऱ्यांचे अनुभव जाणून गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतातील माती परिक्षण, फळबाग लागवड ,सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया,एकात्मिक कीड‌ व्यवस्थापन, शेतातील‌ अवजारांचा वापर, शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आणि इतर विषयावर ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.

या उपक्रमातून आधुनिक शेतीला नवी दिशा मिळेल तसेच वेळोवेळी विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. या उपक्रमासाठी प्राचार्य .डॉ. एम. बी .धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी राऊत, प्रा. डॉ.एच .एल. शिरसाठ, प्रा. पी .सी. ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले .

यावेळी गावच्या सरपंच जिजाबाई‌ काळे ,उपसरपंच सुनील जाधव, ग्रामसेवक संदीप शेटे, पुंजाहरी जाधव ,विवेक शिंदे ,दत्तात्रय दोड, शिवाजी शिंदे, आदी ग्रामस्थ‌‌ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!