Disha Shakti

राजकीय

मिरवडी ग्रामपंचायत सरपंच पदी शांताराम थोरात यांची बिनविरोध निवड….

Spread the love

  दौंड प्रतिनिधी /  किरण थोरात  : दि १४ ऑगस्ट  २०२३, दौंड तालुक्यातील मिरवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शांताराम थोरात यांची सोमवार, दि.१४ ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. शांताराम थोरात यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.  मिरवडी ग्राम पंचायतीच्या सरपंच वनिता थोरात यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.

त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवारी ग्राम पंचायत मिरवडी कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी शांताराम थोरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शांताराम थोरात यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी ग्रामपंचायत मिरवडी ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य जलोष करत शांताराम थोरात यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच शांताराम थोरात यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!