Disha Shakti

सामाजिक

श्री.भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्यालय, पळसपुर येथे स्वांतत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे  : श्री.भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्यालय, पळसपुर येथे स्वांतत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रथम सुरुवातीलाच गावात एक प्रभात फेरी काढण्यात आली घरोघरी तिरंगा हा संदेश यावेळी देण्यात आला गावातील ज्येष्ठ नागरिक रावसाहेब रामभाऊ अडसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानिमित्त गावातील सर्व गावकरी विद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रगीत व देशभक्तीपर समूहगीते मुलांनी सादर केली. यावेळी गावातील माननीय सरपंच, सर्व सदस्य तसेच सर्व कर्मचारी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदर्श विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक बर्वे सर, ज्येष्ठ शिक्षक मते सर ,तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय आहेर बि.वी सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय भुतांबरे सर, साळवे डि.के सर, आहेर ए .वाय ,ठुबे एस. एन सर, ठुबे बी.टी सर ,मोरे सर शिक्षकेतर कर्मचारी थोरात भाऊसाहेब, आहेर मामा, घनदाट मामा, यांनी अथक परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!