इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वतंत्र दिन विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी झेंडावंदनसाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी झेंडावंदन व सरस्वतीचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री मारुतराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थित नागरिक व पाहुणे यांचे मन जिंकली यानंतर दहावी, बारावी व इतर क्रीडा स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर तसेच काटमांडू याठिकाणी झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानपत्र ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट विषयी आपले मनोहर व्यक्त केले यानंतर देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले यानंतर शाळेच्या प्राचार्य सौ वंदना थोरात यांनी विद्यार्थ्यांना, पालक यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले यानंतर उपस्थित विद्यार्थी यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमासाठी भिगवण गावचे प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, भिगवण ग्रामपंचायत सदस्य, भिगवण गावचे आजी माजी पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष श्री बापूराव थोरात, खजिनदार संतोष थोरात, सचिव विजयभैया थोरात, संस्थेचे संचालक नंदराज थोरात, अजय थोरात, संस्थेच्या संचालिका संगीता थोरात, सुशीला थोरात व शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल & ज्युनियर कॉलेज औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवण येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0Share
Leave a reply