अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगाधरवाडी येथे 77 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.भारत माता की जय वंदे मातरम, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो या घोषणांनी गंगाधरवाडी चार संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला.
वावरथ गावच्या सरपंच सौ प्रतिभा ज्ञानेश्वर बाचकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.काशिनाथ बाबुराव बाचकर, श्री ज्ञानदेव कृष्णाजी बाचकर (उपाध्यक्ष), श्री गोरख ठकाजी बाचकर, संजय गांधी निराधार योजनेचे राहुरी चे सदस्य श्री.अविनाश बाचकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.भागवत पवार, शिक्षणप्रेमी नागरिक श्री अशोक बाचकर (फिटर) श्री मल्हारी बाबा शेरमाळे, श्री सतोबाबा शेरमाळे, श्री मिठू चाचा बाचकर, श्री संजय कृष्णाजी बाचकर, श्री.लिंबाजी खेमनर, श्री संजय बाचकर श्री योगेश खेमनर, अनिल खेमनर , भाऊसाहेब शेरमाळे, दत्तात्रय बाचकर, आप्पासाहेब बाचकर, शांताराम बाचकर, गणेश संजय बाचकर, श्री बोल्हाजी बाचकर,अंगणवाडी ताई, सुनिताताई कोळपे व ग्रामस्थ उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषणं झाले. काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करत कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a reply