करमाळा प्रतिनिधी / अक्षय वरकड : करमाळा तालुक्यातील कात्रज येथे आज दिनांक 15 ऑगस्ट2023 रोजी स्वातंत्र्य दिन साजरी करण्यात आला. तसेच पहिली ते सातवीतील मुलांनी भाषणाच आयोजन केल होत झाला तर त्यानंतर माननीय सरपंच मनोहर (बापू) हंडाळ यांनी अंगणवाडीतील लहान मुलांना 15 ऑगस्ट निमित्त कपडे वाटप केले. तसेच खंडेराव वाघमोडे यांनी मुलांना शालेय उपयोगी साहित्य वाटप केले. पेन, खोडरबर,पाण्याच्या बाटल्या अशा प्रकारे शालेय उपयोगी वस्तू वाघमोडे साहेबांनी वाटप केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रहीम तांबोळी व त्यांच्या मित्रांनी लहान मुलांना 15 ऑगस्ट निमित्त खाऊ वाटप केला.भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला त्यामुळे हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ही राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याचा लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला त्यानंतरच्या प्रत्येक स्वातंत्र्य दिन विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात
भारताचा स्वातंत्र्य दिन हा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय सुट्टी आहे जी दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरी केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या ब्रिटिश औपनिवेशिक राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी देशाने केलेल्या कठोर संघर्षाचे स्मरण केले जाते. या दिवसाचे ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व आहे. ज्या असंख्य व्यक्तींनी मुक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांनी केलेल्या बलिदानाची स्मरण आहे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास अहिंसक प्रतिकार बौद्धिक पराक्रम आणि लोकसंख्या मध्ये खोलवर रुजलेली एकतेची भावना याद्वारे वैशिष्ट्यकृत होता.
भगतसिंग,चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल सगळ्यांसह अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केलं.पारतंत्र्याच्या बेड्या तोडून आपला देश उभा राहिला पाहिजे हे स्वप्न या सगळ्यांनीच पाहिलं होतं त्यातूनच ही स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली त्यावर इंग्रजांनी चळवळ हे आंदोलन मोडण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले मात्र अखेर त्यांना आपला देश सोडून जावा लागला. कार्यक्रमास उपस्थित ग्रामपंचायत कात्रज चे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, शिक्षक वर्ग असतील व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
Leave a reply