बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील कासराळी येथील महादेव मंदिरात शंभू महादेवास महाभिषेक भव्य महाप्रसाद व रात्री भजन व जागराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर कमिटीने दिले आहे.
श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगळे आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रावणी सोमवार , श्रावण हा शिव पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र शुभ मानला जातो शस्त्रानुसार श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो तसेच श्रावण सोमवारी महादेवाचे व्रत करून भक्तगण शिवाची आराधना करतात श्रावण महिन्यात महादेवाची उपासना विशेष फलदायी ठरते असे भाविकांची श्रद्धा आहे.
पवित्र श्रावण मास निमित्त कासराळी येथील महादेव मंदिरात शंभू महादेवास पहाटे दुधाभिषेक तसेच महाआरती केली जाते. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसाद व रात्री भंजन,जागराचा कार्यक्रमाचे आयोजन यंदाचा वर्षी करण्यात आले आहे. मंदीराचे बांधकाम झाल्यापासून मागील पाच वर्षांपासून दररोज महादेवाच्या पिंडीवर दुधाभिषेक केला जाते. व श्रावण महिन्यात दर सोमवारी अविरत महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकऱ्यांचा सहभागातून केला जातो. श्रावणात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
यामधे महीला बगीनीचा मोठया प्रमाणात सहभाग असतो. दिवसभर अलोट गर्दी पाहिला सापडते. तसेच तरूण युवकांचा सहभागातून अन्नदानाचे काम दिवसभर चालते. भाविकांचा श्रमदानातून मंदीर व परिसराचे स्वच्छता करण्यात आली आहे. या श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभाग नोंदवावा आपले परमार्थिक जीवन धन्य करून घ्यावे असे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a reply