विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील गायकवाड शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व 77 व स्वांतंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वांतत्र्य दिनाच्या 15’ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान राजेंद्रजी साळवी यांना मिळाला होता
या स्वांतंत्र्य दिनानिमित्त भीम पॅंथर सामाजिक संघटनेचे शिवाजीराव गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भीम पॅंथर सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष विजयाताई बारसे तालुका अध्यक्ष तनवीर शेख युवा तालुकाध्यक्ष अनिल गांगुर्डे, मीडिया जिल्हाध्यक्ष गणेश राशिनकर व सागर राठोड, मंदाताई शिरसाट, चंद्रकांत येवले, राहुल बोर्डे, विठ्ठल गालफाडे यांच्या उपस्थित गरीब विद्यार्थ्यांना केळी व बिस्किटे व शालेय शिक्षण उपयोगी साहित्य वाटप करून करण्यात आले.
या कार्याच्या माध्यमातून मुलांचे मनोबल वाढवले तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून त्या स्पर्धेचे उद्घाटन करून त्यातील विजेते निवडून मुलांना योग्य ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.
Leave a reply