अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील मानोरी येथील स्मशानभूमीसाठी माजी मंत्री व आमदार आणि अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे पाच लाख रुपयांचे काम मंजूर होऊन त्या कामाचे उध्दाटन सोसायटीचे चेअरमन भीमराज वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
मानोरी स्मशानभूमीसाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी शासन निर्णयानुसार नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यामध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन 2022 -23 या आर्थिक वर्षासाठी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत अहमदनगर जिल्याहयातील लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेल्या नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील वस्त्यामधील सुमारे 265 कामांना शासनाकडून तत्वता मान्यता प्राप्त करण्यात आली आहे.माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी विशेष प्रयत्न करून मानोरी गावातील स्मशान भूमिसाठी पाच लाख रुपये मंजूर केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव तोडमल सर, मधुभाऊ भिंगारे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ आढाव, दादासाहेब आढाव, वंचित आघाडीचे बाबासाहेब वि आढाव,माजी उपसरपंच शिवाजी थोरात, रवींद्र आढाव, पोपटराव थोरात, विठ्ठल वाघ, रोहिदास बाचकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार सोमनाथ वाघ आदी मानोरी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या विशेष प्रयत्नातून मानोरी स्मशानभूमीसाठी पेव्हिंग ब्लॉक

0Share
Leave a reply