इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवीन पिढीला जुने सण उत्सव व आपले संस्कृती याची माहिती व्हावी म्हणून नागपंचमी हा सन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात नागपंचमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका सौ. संगीताताई थोरात, सौ.सुशीलाताई थोरात, सौ.सुनिताताई थोरात, सौ. पुजा थोरात, सौ.सोनालीताई थोरात व सौ.हिराबाई बंडगर उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्राचार्या सौ. वंदना थोरात मैडम ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत वारुळाचे पूजन केले यानंतर नागपंचमीच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.तसेच फेर धरून सर्व विद्यार्थीनी पालक व शिक्षक यांनी पंचमीची गाणी गायली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष.मा. बापुराव थोरात, खजिनदार संतोष थोरात, सचिव विजयभैय्या थोरात संचालक नंदराज थोरात, अजय थोरात व पालक यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित “विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज भिगवण” या ठिकाणी नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.

0Share
Leave a reply