शेख युनूस/ अ. नगर प्रतिनिधी : माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे हे वांबोरी येथे बस स्थानकावर गेले असता शालेय विद्यार्थीनींनी आपल्या समस्या प्राजक्त दादा तनपुरे यांच्यासमोर मांडल्या असता तात्काळ दखलघेत प्राजक्त तनपुरे यांनी त्वरित पाठपुरावा केला. अहमदनगर येथे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 13 ते 14 मुलींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत वांबोरी ते अहमदनगर येण्यासाठी मोफत एस टी प्रवासाचे पास मिळाले.
वांबोरी पंचक्रोशीतून अनेक विद्यार्थी हे अहमदनगर येथे विविध महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी एस टी ने दररोज प्रवास करतात. गुरुवारी शिर्डी येथील काकडी येथे मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी अनेक भरपूर प्रमाणात एस टी आरक्षित झाल्याने शालेय व महाविद्यालय विद्यार्थी यांची चांगलीच धांदल उडाली असून गैरसोय मोठया प्रमाणावर झाली. प्राजक्त दादा हे तिथे गेले असता विद्यार्थ्यांनी आपल्या समस्याचा पाडा वाचला असता वांबोरी बस स्थानकात जाऊन विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना बस उपलब्ध करून दिली.
अहमदनगर येथे पेमराज सारडा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनींनी एक महिन्यापूर्वी पास साठी पाठपुरावा केला होता परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत मोफत एस टी प्रवासासाठी पास मिळत नसल्याची तक्रार केली होती ती पण निष्फळ ठरली परंतु प्रजाक्त तनपुरे यांनी चक्रे फिरवली आणि अहमदनगर बस स्थानक व कॉलेज प्रशासना मार्फत तांत्रिक अडचणी दूर केल्या असून दुसऱ्याच दिवशी मुलींच्या हाती मोफत प्रवासाचे पास मिळाले.
लाभार्थी मुलींना पास मिळाल्याने त्यांनी माजी मंत्री प्राजक्त दादांचे आभार मानले. प्रयासी काळे, वैष्णवी परदेशी, पूजा देवकर, वृषाली वाळके, मोनाली देव्हारे, वैष्णवी साबळे, सायली तरवडे, श्रुती बनसोडे, तृप्ती विटनोर, तन्वी ससे, ऋतुजा वाघ, प्राची जग्गी, गायत्री पवार, तनुजा वाघमारे
शालेय विध्यार्थीना माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नामुळे मिळाले मोफत पास

0Share
Leave a reply