Disha Shakti

Uncategorized

कोरडा दुष्काळ जाहीर करा कोपरगाव स्वराज्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागणी….

Spread the love

प्रतिनिधी /  विट्ठल ठोंबरे : कोपरगाव तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करने बाबत स्वराज्य संघटनेच्या वतीने कोपरगाव तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.ऑगस्ट महिना अखेर पर्यंत शासनाचा वतीने तलाठी यांना आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे. अन्यथा १ सप्टेंबर नंतर तहसील कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल पुढील सर्व जबाबदारी शासनाची राहिलं असे निवेदन देताना बोलण्यात आले.

यावेळी स्वराज्य संघटना कोपरगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल भुजाडे, उपतालुका अध्यक्ष राजेंद्र कुरे, शेतकरी आघाडी प्रमुख संतोष मोहन पाटील, युवक तालुका अध्यक्ष हर्षल चिकणे, वाहतूक आघाडी दिनेश जरांड, तालुका संघटक शुभम पिलाई,युवक कार्याध्यक्ष नेताजी अजगे यांसह आदी पदाधीकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!