Disha Shakti

सामाजिक

अक्षय करपे यांची अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड

Spread the love

शेख युनूस / अ.नगर प्रतिनिधी :  राहूरी तालुक्यातील जिगरबाज आणि अन्यायला आपल्याधारदार लेखणीतून वाचा फोडणारे लेखक तथा पत्रकार अक्षय राजेंद्र करपे यांची अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.  अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार अक्षय करपे यांची निवड ही अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय लालासाहेब गायकवाड यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली.

आज समाजात वंचित आणि गरीब वर्ग हा वर्षानुवर्षे गरिबीत होरपळून निघत असून या गरीब हा गरीबच राहत असून या कडे कोणाचेही लक्ष नसुन वंचित आणि गरीब हे आपल्या अन्य गरजेतून वंचित राहत असून त्यांची प्रगती मंदावली आहे.गरीबाला आपले हक्काचे घर आणि सुख सुविधा ह्या मिळत नसून श्रीमंत हा श्रीमंत होत चालला असून गरिबांचा कोणी वाली नसल्याचे वाटत असल्याने गोर गरीब आणि वंचित घटकातील जनतेला आपल्या हाताशी हातभार लावत त्यांना हक्काचे घर आणि शिक्षण मिळावे या उद्धेशाने पत्रकार अक्षय करपे यांना गरिबांचा वाली आणि आपल्या हक्काचा माणूस, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील हुशार व्यक्तिमहत्व म्हणून ओळख असलेले अक्षय करपे यांना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

पत्रकार अक्षय करपे म्हणाले की, आपला उपदेश हा राजकीय नसून, समाजातील गरिबी ही कशी दूर होईल आणि गरीब जनतेचा पैसा, सुख सुविधा ह्या अधिकाधिक माझ्या पदाच्या मार्फत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रातून अभिनंदन व स्वागत व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!