आकर्षक गणेशमूर्ती व रंगकामास वेग ; ६ इंचापासून १४ फुटापर्यंत पसंतीच्या मूर्ती उपलब्
प्रतिनिधी /विट्ठल ठोंबरे : अवघ्या काही दिवसांवर आनंदाचा उत्सव म्हणजे बाप्पाचे आगमन होतं असून देवळा येथील प्रीतम शिरोरे यांच्या कारखान्यात गणरायाची मूर्ती वेगवेगळ्या डिझाईन व आकर्षक रंगामध्ये बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. तीन वर्षांपासून देवळा वाजगांव रस्त्यावर आपल्या सर्वांच्या पसंतीप्रमाणे व दोनशे हुन अधिक वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असलेले गणपतीची मूर्ती 6 इंच पासून ते चौदा फुटा पर्यंत तसेच ५१ रुपये पासून ५१ हजार रुपये पर्यंत मूर्ती उपलब्ध व मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रीतम शिरोरे संपर्क क्र.9028938008 देवळा.
मूर्ती बनवण्याच्या कार्यास फेब्रुवारी महिन्यापासूनचं प्रारंभ होतो. माहिती देताना शिरोरे म्हणाले की, यावेळी मूर्ती बनवण्याच्या कामास ३० ते ४० टक्के वाढ झाली असून शाडू मातीच्या व पीओपी अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती बनविल्या जातात .शाडूच्या मातीच्या मूर्तिपेक्षा पीओपी च्या मूर्ती आकर्षक असतात. पण शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी वेळ जास्त लागत असला तरी त्याची किंमत पीओपी च्या मूर्ती पेक्षा जास्त असते. गणेश मंडळ साठी ३ ते १२ फुटापर्यंत मूर्ती उपलब्ध आहे. तालुक्यातील व मंडळानी या आकर्षक किंमतीच्या लाभ घ्यावा.असे आवाहन शिरोरे यांनी या वेळी केले.