Disha Shakti

सामाजिक

अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनेच्या पाठपुराव्याला यश ; ग्रामविकास विभागाचे महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बायोमॅट्रिक प्रणालीबाबत पत्राद्वारे सुचना

Spread the love

प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : महाराष्ट्रातील जवळपास ९०% ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ठरलेल्या कामाच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेत कधीही ग्रामपंचायतमध्ये हजर राहत नाही, यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक त्रासून गेलेले आहेत व ग्रामसेवकांच्या अशा बेजबाबदारपणामुळे ग्रामविकासासाठी शासनाकडून आलेला लाखों रुपयांचा निधी सुद्धा परत जातो कारण त्या निधीतून कामे करण्यासाठी ग्रामसेवक ग्रामपंचायतला हजर राहत नाहीत. ग्रामसेवकांच्या या मनमर्जी कारभाराला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने युवाशक्ती ग्रामविकास संगठनने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या ३२ जिल्ह्यातील जिल्हा संघटनांच्या माध्यमातून ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी डिसेंबर २०२१ पासून शासन दरबारी निवेदने देत सतत पाठपुरावा केला.

अखेर ग्रामविकास मंत्रालयाने युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या वतीने ०६ जून २०२३ रोजी मुख्य सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत २४ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नावे पत्र क्र.संकीर्ण -२०२३ /प्र.क्र.४५३/आस्था-७ काढत ग्रामसेवकांना नियमानुसार बायोमॅट्रिक प्रणालीने हजेरी लागू करण्यासाठी सूचना दिलेली आहे.युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्याचे आभार मानले व लवकरच ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून सुद्धा सक्तीने अमलबजावणी करण्यात येइल ही अपेक्षा व्यक्त केली.

तसेच युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक /अध्यक्ष श्री.इमरान पठाण, सचिव श्री.पुरुषोत्तम सदार व अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री.दादासाहेब विधाते, जिल्हा उपाध्यक्ष श्री.जावेद शेख (दक्षिण) व जिल्हा उपाध्यक्ष श्री.रमेश खेमनर (उत्तर), जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी श्री.नारायण कराळे, श्री.शरद भगत, श्री रावसाहेब घुगे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष श्री.संदीप साळवे व सर्व जिल्हा/तालुका पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि ग्रामविकास विभागाच्या सुचनेनंतरही जर पुढील ०३ महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी बायोमॅट्रिक प्रणाली सुरू करण्यात आली नाही तर आता या विषयासाठी युवाशक्ती ग्रामविकास संगठनकडून राज्यभर आंदोलन करण्यात येइल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!