प्रतिनिधी: शेख युनूस / अ. नगर भारत देशातील लोकशाहीला बळकट आणि भक्कम करण्यासाठी मतदार यांच्या मताला बहुमूल्य मोल आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरुण तरुनींनी पुढाकार घेऊन मतदार यादीमध्ये नांव नोंदविण्यासाठी निवडणूक विभागाशी संपर्क साधावा आणि मतदार नांव नोंदणी प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आव्हान माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. भारत देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांच्या प्रत्येक मताला किंमत असून बहुमोल असे आहे त्यामुळे आपल्या योग्य उमेदवाराला मत देऊन मतांचा हक्क बाजवावा. ज्या युवक व युवतीचे वय अठरा पूर्ण झाले त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
राहूरी मतदार संघामध्ये शासकीय निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. अठरा वर्ष पूर्ण झालेल्या तरुण आणि तरुनींनी स्वतः च्या वयाच्या पुराव्यासह महत्वपूर्ण कागदपत्र शासकीय कार्यालयामध्ये जमा करणे जरुरीचे आहे. अहमदनगर, पाथर्डी आणि राहूरी मतदार संघातील महसूल कार्यालयामध्ये नवीन मतदार नोंदणी प्रकिया सुरु आहे. जर नवीन मतदार नांव नोंदविण्यास काही अडचण असल्यास आमदार प्राजक्त तनपुरे कार्यालयामध्ये मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.