Disha Shakti

क्राईम

झाडाला उलटे टांगून चार युवकांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक ; दलित संघटना संतप्त

Spread the love

विशेष प्रतिनिधी /इनायत आत्तार : श्रीरामपूर येथील चार मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना शनिवारी रात्री अटक केली आहे. गुरुवारी घडलेली या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

ग्रामस्थांनी शुक्रवारी हरेगाव बंद ठेवून घटनेचा निषेध करीत आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, दलित संघटनांचे कार्यकर्ते आदींनी रुग्णालयाला तातडीने भेट दिली. राधाकृष्ण विखे यांनी घटनेचा तपशील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

सहा आरोपींपैकी पप्पू पारखे आणि दीपक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. “पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले असून गृहमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम पाळावा आणि बंद करू नये,” असे आवाहन पालकमंत्री विखे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!