Disha Shakti

Uncategorized

गणेश उत्सव काळात गणपती मंडळांनी हाय पॉवर DJ डॉल्बी सिस्टम लावल्यास कारवाई करणार – पो.नि.धनंजय जाधव

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : पुढील महिन्यात दि.१९ सप्टेंबर पासून गणेश गणेश उत्सव सुरुवात होत आहे या उत्सव काळात सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सवासाठी हाय पावर डीजे डॉल्बी सिस्टीम लावू नये अन्यथा डॉल्बी सिस्टीम वाहनसहित वाहनावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राहुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

सर्व गणेश उत्सव मंडळ यांना सूचित करण्यात येत आहे की, दिनांक १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. सदर गणेश उत्सवासाठी काही मंडळांनी पुणे, कराड, सातारा, सांगली येथून हाय पावर (डीजे) डॉल्बी सिस्टम बुक केल्या आहेत असे समजते.

परंतु गणेश उत्सवामध्ये आवाजाच्या मर्यादेचे पालन करायचे असल्याने अशा हाय पॉवर DJ डॉल्बी सिस्टमवर तसेच ज्या वाहनांमधून डॉल्बी सिस्टम आणलेली आहेत अशी वाहने जप्त करून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वरील प्रमाणे कोणीही हायपॉवर DJ डॉल्बी सिस्टम बुक करू नये, ऑर्डर करू नये, ऍडव्हान्स देवु नये नंतर कोणाचीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही असे आवाहन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!