भारत कवितके / मुंबई प्रतिनिधी : मंगळवार दिनांक २९ आगस्ट २०२३ रोजी पुणे स्वारगेट येथील गणेश कला मंच येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात, उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आग्रा,या ठिकाणाहून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.व्यासपिठावरुन अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडून राष्ट्रीय समाज पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुरुषा सह महिला वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना महादेव जी जानकर म्हणाले,” मतदार कमी असलेले नेते बनले,तर मतदार जास्त असलेले भीक मागतात,ही खरी खंत आहे.पण आम्हाला कुणी भिकारी समजू नये.आमचा निर्णय आम्ही घेऊ.आम्हाला लबाडी करता येत नाही.पोटात असते ते ओठांवर असते.४८ लोकसभेची तयारी आतापासूनच करा.भानगड करणारे तिकडे जात आहेत.मुळात आमची भानगडच नाही.सर्व समाजाला सत्तेत हिस्सा मिळावा.महाराष्ट्राची दिशा बदलल्याशिवाय रासप राहणार नाही.सर्व सामान्यांचे सरकार आणणारच.जिनकी जितनी संख्या भारी उजनी उनकी भागिदारी, दिल्ली में तो जाना हमारा मकसद है,लेकीन सही मार्ग से,मी स्वाभिमान शिकलेला नाही.
महादेव जी जानकर आपल्या भाषणातून विचार व्यक्त करताना सभागृह टाळ्या,शिट्या व घोषणाबाजी नी दणाणून गेले होते.या वेळी अक्की साहेब, रत्नाकर गुट्टे, आग्रा हून बालयोगी महाराज, दिल्ली हून वईरपआल सिंग,किनूर साहेब, गुजरात हून सुशील शर्मा, तामिळनाडू हून कायाळ विजार,नरेश वाल्मिकी, मंगेश झिजे, रमेश पिसे, उत्तर प्रदेश हून चंद्र पाल, बिहार हून गोपाळ पाठक, रविंद्र कोठारी,संजय माने, विठ्ठल यमगर, गोविंद राव सैन्य,मोहन माने,राजेश फड, लक्ष्मण राज पुरोहित,जयपाल कुर्मी, वैशाली वीरकर,माऊली सलगर,शारदा सरंसिंग,सुवर्णाताई,आदि नी आपली भूमिका मांडली व वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Leave a reply