प्रतिनिधी/ भारत कवितके : रविवारी दिनांक 27 ऑगस्ट 2023 या दिवशी क्षितिजावरची शब्दपर्णवी साहित्य मंच या समूहाचे राज्य स्तरीय काव्य संमेलन आणि गुणगौरव सोहळा पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. हे संमेलन छत्रपती संभजी नगर मध्ये बजाजनगर मधील सिध्दी विनायक गणेश मंदिर त्रिमूर्ती चौक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात, आणि सर्व मान्यवरांना पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले,
या संमेलन अध्यक्ष, मा.विठ्ठल घाडी सर, मुंबई उदघाटक मा.सौ.आशा ब्राह्मणे, मुंबई प्रमुख अतिथी मा.श्री रज्जाक शेख, श्रीरामपूर मा.ज्येष्ठ साहत्यिका सौ.माधुरी चौधरी, आणि शिवतेज शाळेचे संस्थापक श्री.प्रकाश परदेशी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडी ने करण्यात आली. त्यानंतर पाहुण्याचे औषण करून व्यासपीठावर बसविण्यात आले.
या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून प्रार्थना घेण्यात आली .या प्रसंगी या कार्यक्रमाची आयोजीका कवियत्री लेखिका कल्पना निंबोकार अंबुलकर यांच्या आठवणीची मोरपीस ललित संग्रह व साक्ष सागराची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर कल्पना अंबुलकर यांनी प्रास्तविक भाषण केले.
याप्रसंगी बोलताना परदेशी सर म्हणाले की कवी आणि लेखक विचारवंत शिवाय पुस्तकच तयार होवू शकत नाही. त्यांनी पुस्तक प्रकाशन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. श्री विठ्ठल घाडी यांनी कार्यक्रमा आपले मनोगत मांडले श्री रज्जाक शेख यांनी आपल्या गजल सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ज्येष्ठ साहित्यिक माधुरी चौधरी यांनी कल्पना अंबुलकर यांच्या पुस्तकावर आपले मनोगत मांडले त्यानंतर पुरस्ककार सोहळा साजरा झाला.
पुरस्कारांची नावे याप्रमाणे
श्री.भारत कवितके ( महाराष्ट्र सहित्य भूषण पुरस्कार) प्रा.संजय बंडूजी धांडे ( आदर्श शिक्षक पुरस्कार) कवी.मोहन अशोक पाटील ( महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार) मंजू वानखेडे(वनवे) ( महाराष्ट्र सहित्य गौरव पुरस्कार) अनुराधा वायकोस,( महाराष्ट्र सहित्य गौरव पुरस्कार) विजया लेवटे, ( आदर्श शिक्षिका पुरस्कार) साधना काळबांडे, ( महाराष्ट्र काव्यगौरव पुरस्कार) रेखा दिलीप सोनारे ( समाज भूषण पुरस्कार) शशांक देशमुख,( क्षितिजवरचा काव्यतारा पुरस्कार) पल्लवी पवार पुणे( क्षितिजवरचा काव्यतारा पुरस्कार) वैशाली चांदेकर, ( क्षितिजवरचा काव्यतारा पुरस्कार) विलास त्र्यंबक डोलारकर( जीवन गौरव पुरस्कार) सारिका सोनजे , ( क्षितिजवरचा काव्यतारा पूरस्कार) सोमान बारसकर , (उत्कृष्ट काव्यतारा पुरस्कार) सागर भोगे, ( विदर्भ भूषण पुरस्कार) सीमाराणी बागुल, ( जीवन गौरव पुरस्कार) सुरेखा बेंद्रे ,( समाज गौरव पुरस्कार ) विजय पाटील ( समाज गौरव पुरस्कार)
उल्हास देशपांडे ( समाज गौरव पुरस्कार)
चैताली वरघट ( विदर्भ भूषण पुरस्कार)
वैशाली प्रवीण शिंदे (महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार) कल्पना लांडे ( महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार) मंगल वाघमारे ( महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार) सुचिता पापडकर ( वृक्षमित्र पुरस्कार )
कविसंमेलन घेण्यात आलेल्या संमेलनात 60 कवींनी सहभाग घेतला आणि उत्तम कविता सादरीकरण करून संमेलनात काव्यची सरी बरसावली.या संमेलनासाठी रिक्तीका जमधडे भविका जमधडे समर्थ शिवशेट्टे स्वरूप शिवशेट्टे अवधूत कुलकर्णी या बाल कलाकारांनी आपल्या नृत्याने व भाषणाने रसिकांची मने जिंकली सह आयोजक कु. प्रमोद न.सुर्यवंशी यांना शॉट फिल्म आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली त्यासाठी सन्मानित करण्यात आले.
कवी दीपक नागरे सर आणि मंजू वानखडे मॅडमने या दोघांनी हि लय भारी सुत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सौ.कल्पना अंबुलकर निंबोकर, श्री. प्रशांत अंबुलकर, क्षितिज अंबुलकर आणि सह आयोजक म्हणून प्रमोद न सूर्यवंशी लाभले. छ.संभाजीनगर मधले उत्तम उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद हि दिला.
दरवर्षी प्रमाने यंदाही क्षितिजावरची शब्दपर्णवी साहित्य मंचाचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0Share
Leave a reply