दिशा शक्ती प्रतिनिधी /भारत कवितके : 31 ऑगस्ट विमुक्त दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र, श्रीमती शैलजा विजय गिरकर समरसता सभागृह फुलपाखरू उद्यान, मगाठणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर विराजमान श्रीकुमार शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रानावनात भटकत राहून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा हा भटका विमुक्त समाज स्वातंत्र्यानंतर अडगळीत पडला.देश 1947 ला स्वतंत्र झाला त्यानंतर या समाजाच्या लोकांना तब्बल पाच वर्षानंतर 1952 साली बंदिवासातून मुक्त केले.जन्मतःच गुन्हेगारीचा शिक्का बसलेला हा समाज आजही वंचितांचे जीवन जगत आहे.त्यांच्या विकासासाठी आपण सारे एकत्रित प्रयत्न करू असे ते म्हणाले.
या वेळी वडार समाजाचे नेते व महाराष्ट्र क्रांती सेना भाजप भवीआ महाराष्ट्र प्रदेश ऊपाध्यक्ष प्रमुख श्री बबनराव मोहिते हे म्हणाले की, या समाजास एकत्र करून यांच्यात जागृती करण्यासाठी मी गेल्या तीस वर्षांपासून काम करीत असून त्याला यश येत आहे आपला समाज जेथे जेथे आहे तेथे समाज मंदिर उभे करण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले. धनगर महिला एकता संघ अध्यक्षा श्रीमती निहारिका खोंदले यांचे ही मार्गदर्शन झाले. आपले मार्गदर्शक आदरणीय दादा इदाते यांचे मुळे केन्द्र सरकारने आपल्या समाजाची नोंद घेतली असून समाजाचे विकासासाठी केंद सरकारने बोर्ड बनविला आहे ही भटक्या विमुक्तांच्या जीवनात नवी पाहाट आहे. वस्त्यांमध्ये फिरून समाजाच्या अडचणी जाणून घेवून त्यांना सहाय करण्यात येईल असे त्या म्हणाल्या.यावेळी यश फायनान्स चे श्री संजय आहेर यांचेही मार्गदर्शन झाले.
यावेळी नाथपंथी डवरी गोसावी समाज मुंबई प्रमुख श्री अनिल चौगुले, बागडी समाज मुंबई अध्यक्ष श्री अंकुश बागडी, श्रीमती अर्चना लष्कर, श्रीमती आशा पवार,संगीता पाथरवट, श्याम कुऱ्हाडे, व विविध राजकीय पक्षांत काम करणारे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.श्री मंगेश शिंगे यांचे देशभक्तीपर गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सहदेव रसाळ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संदेश रसाळ,श्री संदेश भागवत यांनी प्रयत्न केले.
Leave a reply