दिशा शक्ती प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील वाढती दोन समाजातील तेढ निर्माण होऊन अल्पसंख्यांक, गरीब मराठा, समाजावर अन्याय होत आहे, त्यांना आरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे फॉर्मुला आहे. वंचिताना सत्ता दया, मराठा आरक्षण मिळवून देऊ अशी. भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. . . सभेला मार्गदर्शन करताना आंबेडकर म्हणाले कि, मोदी हे केवळ. गुजरातचे पंतप्रधान आहेत. देशाविरोधी कार्यवाही करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते, तोच नियम पंतप्रधान मोदी यांच्याबाबत लागू होईल.
भारत देशात इन्शाफ आणि इन्शानियत जिवंत राहिली पाहिजे. निवडणुका जवळ येतील तशा दंगली घडविल्या जातील. भारत देशात शस्त्र बाळगण्याचा अधिकार संघवाल्याना कोणी दिला ? का ? दिला ? असा सवाल ही आंबेडकर यांनी केला. वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनानी राहुरीतील वंचित बहुजन आघाडी जन आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवला. महिला, पुरुषांनी, आणि युवक कार्येकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .
आगामी निवडणुका लवकरच घेतल्या जातील आणि. या महिन्यातील लोकसभेचे विशेष अधिवेशन हे शेवटचेच अधिवेशन सत्र असण्याची शक्यता आहे. मणिपूर येथील महिलांवर अत्याचार होऊनही पंतप्रधान गप्प का? पंतप्रधान यांनी ८५ दिवस मौन पाळले, मोदी त्यांच्या घरातील महिलांना न्याय देऊ शकले नाही मग. मोदी जी भारत देशातील महिलांना काय न्याय देणार, असा सवाल प्रश्न आंबेडकर यांनी केला.
जाणता राजा असलेले शरद पवार हे कारखानदारांचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांना शेतकऱ्याचे काही घेणे नाही ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही म्हणूनच त्यांनी शेतीमालला हमीभाव कायदा दिला नाही. .सेनेप्रमाणेच काँग्रेस बरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत, पण काँग्रेस चे घोडे कुठे पाणी पीत आहे तेच आम्हाला समजत नाही. एन सि पी काँग्रेस चे धोरण ठरवित आहे आणि एन सि पी आता भगवी एन सि पि झाली आहे, अशी जोरदार टीका ही आंबेडकर यांनी केली.
बहुजन जन आक्रोश सभेत डॉ.जालिंदर घिगे, मेघनाथ जाधव,तय्याब जाफर, राजूभाऊ आढाव, मुनाआप्पा, अहमदभाई जागीरदार, सुरेश शेळके, मदिना आप्पा शेख, भाऊसाहेब पागिरे, मुज्जफर शेख, विशाल. कोलगे, अजीज भाई, वर्षा ताई बाचकर, निलेश जगधने, मौलाना इर्शाद, संतोष. चोळके, राजेश कडक, अशोक हिंगे, सुजात आंबेडकर, जावेद भाई कुरेशी, दिशा पिंकी शेख,फारुख भाई अहेमद, संजय संसारे पिंटू नाना साळवे आदी मान्यवर हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply