इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२३ असा अखंड हरिनाम सप्ताह तिसरे तपपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकिर्तन, रात्री ९ : ३० महाप्रसाद, रात्री ११ ते २ हरिजागर असा दिनक्रम असायचा.
अखंड हरिनाम सप्ताह तिसरे तपपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी कीर्तनासाठी महाराज हे महाराष्ट्र प्रसिद्ध असलेले ह भ प अमोल महाराज सुळ, ह भ प अनिल महाराज तुपे, ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ह भ प निलेश कोरडे, कबीर महाराज अत्तर, ह भ प अक्रूर महाराज साखरे, ह भ प समाधान महाराज शर्मा यांना आमंत्रित करण्यात आले होते त्याच प्रमाणे गायनाचार्य ह भ प अविनाश महाराज जाधव, तसेच पखवाज वादक ह भ प भूषण महाराज गुरव, ह भ प नंदराज महाराज पाटील हे महाराष्ट्रात नामाकित असणारी मंडळींना आमंत्रित करण्यात आले होती यांनी ही आपल्या नावाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मदनवाडी आपल्या कलेने व विचाराने तसेच गायनाने उपस्थित सर्वच मंत्रमुग्ध होऊन पांडुरंगाच्या विचाराने लिन झाली.
या अखंड हरिनाम सप्ताहात रोज सकाळी व सायंकाळी हजारोच्या पंगती उतल्या आणि या पंगतीसाठी अन्नदाते पुढे आले व त्यांनी जेवढा जनसमुदाय उपस्थित राहील तेवढ्यासाठी अन्नदान पुरेल एवढं अन्न तयार केले जात होते. तसेच रोज दिड ते दोन हजाराच्या वर जनसमुदाय उपस्थित राहत होता त्यापैकी अनेक जण रोख स्वरूपात देणगी दिली जात होती १००/- रुपये ते ३१०००/- रुपया पर्यंत देणगी दिली जात असे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहून यथोचित रोख स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताहसाठी देणगी दिली.
अखंड हरिनाम सप्ताहमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे हरिकिर्तनासाठी उपस्थित ह भ प महाराजांसाठी हर घेऊन जाणारा गरुड व पंगत कितीही मोठी असली तरी पंगतीत सगळ्यांना सर्व महाप्रसाद मिळत असे त्यासाठी गावातील लहान मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिक मनापासून काम करताना दिसत होते. हरिनाम सप्ताह मंडळ व भजनी मंडळ मदनवाडी मागील १ महिन्यापासून तयारी करत होते. अध्यक्ष अमोल देवकाते पोलिस कॉन्स्टेबल व ह भ प जाफर मुलाणी व भजनी मंडळ व मदनवाडी गावातील तरुण मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply