विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार (श्रीरामपूर) : केंद्रशासनाचे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे ग्रामीण भागातील कुटुंबाना सन २०२४ पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाना “हर घर नल से जल” पाणीपुरवठा करण्यास शासन कटिबद्ध आहे. सदर योजनेसाठी केंद्रशासन व राज्यशासन यांचा सामाईक हिस्सा आहे. त्यासाठी राज्याला अंदाजित १४००० कोटी खर्च येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ ली. प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्धिष्ट असुन सन २०५३ पर्यंत अंदाजित लोकसंख्या ढोबळमानाने धरणेत आलेली आहे. भविष्यात पाणीपुरवठा योजना काम होणे शक्य नाही.
जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या संपुर्ण अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जबाबदार असेल, असे शासननिर्णयात नमुद आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अहमदनगरचे माध्यमातुन जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम चालु आहे. सदर कामासाठी अंदाजित ४००० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर पुर्ण करणेत आलेली असुन सदर कामाचे ठेकेदार / एजन्सी नेमणुक करणेत आलेली आहे.
गावोगावी सदर योजनेचे काम पुर्ण झालेले नाही. काही ठिकाणी पाणी उद्भव – विहिर खोदकाम, पाईपलाईन काम, पाणी टाकी काम बाकी आहे. व जी कामे झाली ती निकृष्ठ दर्जाची झालेली असुन अपुर्ण आहे. परंतु,सदर योजनेतील पुढील टप्पा कुटुंबाना वैयक्तिक नळजोडणी करणेसाठी जिल्हा परिषद स्तरावर निविदा प्रक्रिया राबविणेची अत्यंत वेगाने हालचाली सुरु आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारी वर्गाना केव्हा समजेल “आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ” गावोगावी संबधित योजनेचे काम अपूर्ण स्थितीत असताना वैयक्तिक नळ जोडणी करणेसाठी अति घाईचा अट्टहास कशासाठी? या योजनेत वैयक्तिक नळजोडणी करणेसाठी शासनाने भरमसाठ आर्थिक तरतुद केलेली आहे.
सदर कामाचे ठेकेदार / एजन्सीने वितरण व्यवस्थेचे कामे करताना गावातील सर्व भागांना समप्रमाणात व पुरेश्या दाबाने पाणीपुरवठा होईल की नाही याबाबत गावोगावी शंका आहे. नव्हे तर, गावकारभारी असणारे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांचे ठाम मत आहे. तसे त्यांनी वेळोवेळी अनेक सभामधुन निदर्शनास आणुन दिलेले आहे. तरीही जिल्हा परिषद प्रशासन आपलेवरील बला टाळणेसाठी कुटुंबाना वैयक्तिक नळजोडणी करणेसाठी कामाचे निविदा देण्याचे आमिष सरपंच यांचे माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर ढकलणेचा प्रकार भविष्यात घडलेस वावगे ठरू नये.
परंतु, सदर योजनेचे अपयशास ग्रामस्थाचे रोषाला सरपंच व अनेक लोकप्रतिनिधीना सामोरे जावयाचे आहे. म्हणुन अनेक सरपंच महोदय यांनी सदर वैयक्तिक नळजोडणी काम न करणेस स्पष्ठ नकार दिलेला आहे. तरी, जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत गावोगावी चालु असलेले कामाची तांत्रिक व आर्थिक चौकशी करून दोषी वरिष्ठ अधिकारी यांचेवर कारवाई करणेत यावी. अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणेत येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे भिम पॅथर सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे.
Leave a reply