दिशाशक्ती प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे थोर स्वातंत्र्यसेनानी प.पु स्वामी सहजानंद भारती यांची समाधि असून या समाधि स्थळावर श्री १०८ मंहत स्वामी चैतन्य भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी सहजानंद भारती तरुण मंडळाच्या अंथग परिश्रमातून स्वामीजीची ५२ वी पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सोहळा दि १ /९ /२ ३ ते दि७ / ९ / २३ पर्यंत संपन्न होत आहे यानिमित्तानी शुक्रवार दि १ / ९ रोजी सकाळी ८ ते १२ वाजता स्वामीजींच्या प्रतिमेची नाऊर गावातून भव्यदिव्य अशी मिरवणूक पार पडली.
तसेच १ ते ६ तारखेपर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ९ किर्तन व महाप्रसाद आयोजित केलेला असुन या निमित्ताने हभप . इश्वर महाराज ‘ कदम ,दादा महाराज तांबे , सचिन महाराज जपकर, यांचे किर्तन झाले असून दि ४ / ९ रोजी श्री श्री१००८ महामंडलेश्वर संत सुखदेव महाराज तर दि ५ / ९ रोजी स्वामी हरीशरणगिरी महाराज तर दि.६ / ९ / २३रोजी हभप श्री विशाल महाराज खोले यांचे सांय ७ ते ९ किर्तन दि ७ / ९ / २ ३ रोजी सकाळी ९ वा गुरुवर्य श्री स्वामी रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद होणार आहे .
स्वामीजी हे वैदिक सनातन हिंदू धर्माच्या आद्य शंकराचार्य परंपरेतील दशनामी *भारती* सन्यासी होते सन १९१४ च्या दरम्यान नाऊर येथे आलेत व गोदावरी आश्रमाची स्थापना करून देश स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिक बनवून बऱ्याच वेळेस तुरुगवास ही भोगला तर स्वातंत्र्य प्राप्तीनतर राजकीय ‘ सामाजिक ‘ शैक्षणिक आणि धार्मिक कार्ये करत सन १९७१ पर्यंत देश व धर्म यासाठी सर्पूण आयुष्य समर्पन करून १५ ऑगस्ट १९७१ रोजी गोकुळाष्टमी (श्रावण कृ १० ). च्या दिवशी ब्रम्हलीन झालेत त्यामिमित्ताने या वर्षी ५२ वी पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सोहळा पार पडतोय व दररोज हजारो भाविक किर्तन व महा प्रसाद याचा लाभ घेत आहेत.
या सोहळ्यास पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यथाशक्ती मदत करत आहेत. या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे असे तरुण मडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे गोदावरी आश्रम नाऊर
Leave a reply