Disha Shakti

सामाजिक

गजानन पाटील चव्हाण राज्यस्तरीय युवारत्न नागरी पुरस्काराने सन्मानित

Spread the love

नांदेड प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : गेल्या पंधरा वर्षापासून राजकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन सर्वसामान्य गोरगरीब लोकांची सेवा करून आपल्या कार्याची प्रतिमा सर्वत्र परिचित करून देणारे गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषदेच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय युवारत्न नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नायगाव मतदार संघाचे युवा नेते म्हणून गजानन पाटील चव्हाण हे आपल्या अल्पवधीतच अंसख्य जनाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, दिवस-रात्र सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने ते करीत असल्याने त्यांच्या या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन नांदेड येथील कुसुम सभागृह येथे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत, उद्घाटक मा.आ.शंकर अण्णा धोंडगे, मार्गदर्शक प्रदीप दादा सोळंके, मुख्य अतिथी गिरीश भाऊ जाधव, प्रमुख पाहुणे विश्वंभर धोपटे, बालाजी बामणे, राम येडते, राजेश ढवळे, सौ. चंद्रकला माने, ज्येष्ठ नागरिक भाऊराव पाटील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गजानन पाटील चव्हाण यांना राज्यस्तरीय युवारत्न नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सदर पुरस्काराबद्दल पिराजी डोईवाड, साईनाथ इबीतदार, किशोर महाराज धर्माबाद, भागवत पाटील भुताळे, प्रमोद बिरेवार, शेख जलाल कुरेशी, बालाजी नारे, गजानन तमलुरे, प्रवीण बिरेवार, अशोक पवार, कैलास भालेराव, विठ्ठल गवळी, साईनाथ देशमुख अधिजणांनी गजानन पाटील चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिले आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!