प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : तपासणीची फी मागितल्याच्या कारणावरून डॉक्टर दाम्पत्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली. या घटनेमुळे टाकळीमिया येथे व तालुक्यातील धनगर समाजा बांधावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून या घटनेच्या निषेधार्थ 5 सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका व यशवंत सेना, अहिल्यानगर यांच्यावतीने तहसील कार्यालयावर धनगर समाज बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ज्ञानेश्वर बाचकर,रामदास बाचकर, पिंटूनाना साळवे, बाळासाहेब जाधव, रवीभाऊ मोरे, सुरेश अप्पा निमसे, अण्णासाहेब पाटील बाचकर, डॉक्टर प्राची विटनोर, डॉक्टर घावटे नानासाहेब पाटील जुंधारे आदी मान्यवरांनी तीव्र शब्दात या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला.
यावेळी यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी यावेळी सांगितले की १ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता डॉ.विटनोर यांचा फोन आला की माझ्यावर खोटी ॲट्रॉसिटीची केस दाखल करण्यात आली आहे. तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या मी स्वतः पोलीस स्टेशनला पोहोचून राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. डॉ.वीटनोर यांच्या पत्नी यांनी सांगितले की माझ्या हॉस्पिटल तपासणी फी मागण्याच्या कारणावरून माझे पती डॉ.वीटनोर व हॉस्पिटलवर हल्ला करण्यात आला असून हॉस्पिटल मधील तोडफोड झाली आहे मला फिर्याद द्यायची आहे परंतु प्रकरण गंभीरतेने न घेता रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने फिर्याद दाखल करून घेतली. मी महिला डॉक्टर असून कुठलीही काळजी पोलीस प्रशासनाने घेतली नाही उलट मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातून आई-वडिलांनी कष्ट करून मुलांना डॉक्टर केले परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डॉक्टर विटनोर यांना गंभीर गुन्ह्यामध्ये गुंतविण्यात आले असून यास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हेच कारणीभूत आहेत असा आरोप विजय तमनर यांनी केला आहे.
या सर्व घटनेची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलस अधीक्षक, यांच्याकडे करण्यात येईल व सदर घटनेमध्ये चार दिवसात ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा व गुन्हा खोटा आढळल्यास सदरील व्यक्तीला कठोर शिक्षा करावी अन्यथा डॉ.विटनोर यांच्या कुटुंबासह संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी अशा प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी दिल्या आहेत.यावेळी मागणीचे निवेदन राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना देण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्यांने उपस्थित राहून पाठिंबा दिल्याबद्दल डॉ.प्राची विटनोर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी गंगाधर पाटील तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, अण्णासाहेब बाचकर, रामदास बाचकर, अण्णासाहेब बलमे, विठ्ठल बाचकर, अनिल डोलनर, विजय बलमे, डॉक्टर एकनाथ बाचकर, विलास विटनोर, डॉक्टर घावटे, भाऊसाहेब जगन्नाथ विटनोर,संदेश जुंधारे, रभाजी गावडे, मच्छिंद्र बाचकर,तुषार बाबासाहेब विटनोर, दत्तात्रय बाचकर, आप्पासाहेब लक्ष्मण विटनोर, किशोर सूर्यभान तमनर, सर्जेराव जगन्नाथ लाटे,डॉक्टर सुनील विटनोर,विजय विटनोर, रवी भाऊ मोरे, डॉ.प्राची विटनोर, वर्षाताई बाचकर, रेखाताई नरवडे, नानासाहेब जुंधारे, अर्जुन पाटील बाचकर, संदीपराव विटनोर, संदीप तमनर, वसंत पाटोळे अदी विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.अनिल विटनोर यांच्यावरील खोटी ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची यशवंत सेना जि.प्रमुख विजय तमनर यांची मागणी

0Share
Leave a reply