Disha Shakti

सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मांडवे बुद्रुक येथे गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी /शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील मांडवे बु येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व श्री राधा यांच्या वेशभूषा करून उत्तम सादरीकरण केले वेशभूषेतील श्रीकृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी मांडवे गावातील अनेक ग्रामस्थ तथा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री नांगरे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमासाठी श्री शेंडगे सर श्री.भांड सर श्री साळवे सर व श्री कोरडे सर यांनी मेहनत घेतली.

यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध कृष्ण गीतांवर ठेका धरत उत्तम नृत्य सादर केले. आपल्या मातृभूमीचे आपल्या उज्वल परंपरेचे आणि समृद्ध संस्कृतीचे जतन करण्यासाठी अशा विविध उपक्रमांचे शाळेमध्ये नेहमीच आयोजन केले जाते यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो शाळेकडून व सर्व शिक्षकांकडून सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!