Disha Shakti

सामाजिक

आरक्षण अंमलबजावणीच्या मुद्यावर धनगर समाज झाला आक्रम

Spread the love

भारत कवितके / मुंबई कांदिवली : बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी अहमदनगर अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी बेल भंडारा उधळून यशवंत सेना , महाराष्ट्र राज्य यांनी धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी करीता आमरण उपोषणाला सुरुवात करुन धनगर समाज आक्रमक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

धनगर समाजाचे बांधव जरी या मुद्यावर आक्रमक होत असले तरी शांततेनेच आंदोलन चा मार्ग हाताळला जाईल.याबाबत मात्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेली 70 वर्षे धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी पासून वंचित राहिला ,या बाबतीत धनगर समाजाकडून वारंवार आंदोलने करून लढून सुध्दा पदरी निराशाच पडत गेली.जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी या मुद्यावर उत्सुकता,तत्परता पाहिजे तेवढी दाखविली नाही, फक्त आणि फक्त मतदानापूर्वी या बाबत खोटी,फसवी आश्वासने दिली जात होती.आता मात्र लवकरात लवकर आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने पाऊल उचलावे,या करीता महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज आक्रमक होऊ पाहत आहे.

सर्व ठिकाणी निवेदने दिली जात आहेत.मात्र आंदोलने शांततेनेच केली जातील. या विचाराने समाज बांधव एकवटला आहे.चौंडी येथील सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या आमरण उपोषणाला नक्की यश येईल,अशी अपेक्षा धनगर समाज बांधवांच्या मनात आहे.बाळासाहेब दोडतले व माणिकराव दागडे यांनी समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.चौंडी येथील या आमरण उपोषण आंदोलना मध्ये अहिल्याबाई होळकर चे माहेरचे वंशज अक्षय शिंदे, आण्णासाहेब रुपनर माळशिरस, गोविंद नरवटे लातूर,सुरेश बंडगर परभणी, समाधान पाटील जळगाव, नितीन धायगुडे नातेपुते,किरण घालमे इंदापूर, बाळासाहेब गायके बीड, चौंडी चे सरपंच सुनील उबाळे,अजित शिंदे,अतिश शिंदे,अमोल उबाळे, गणेश उबाळे आदिंचा सहभाग आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!