Disha Shakti

सामाजिक

चौंडी येथील उपोषणकर्त्याना नांदेड, लातूर परभणी, बीड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांचा पाठिंबा

Spread the love

प्रतिनिधी / नंदकुमार पोले : श्रीक्षेत्र चोंडी येथे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या धनगर समाज बांधवांना पाठिंबा देण्याकरता सबंध मराठवाडा व महाराष्ट्रातून तरुणांची वज्रमुठ एकत्र होत आहे आज काही अहमदपूर चाकूर लोहा कंधार गंगाखेड पालम आंबेजोगाई बीड या भागातून तरुण मंडळी चौंडी येथील उपोषण स्थळी या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता आलेली होती.

तरुणांचा जो उत्साह पाहून भविष्यातील आंदोलन निश्चितच उग्र स्वरूप घेईलअशी शक्यता नाकारता येत नाही उपोषणाला बसून आज पाचवा दिवस झालेला आहे. उपोषणकर्त्या समाज बांधवांनी असा निर्धार केलेला आहे एक तर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जीआर काढा अन्यथा आम्ही या ठिकाणी अहिल्या मातेच्या चरणी प्राण अर्पण करण्यासाठी तयार आहोत असा पवित्रा घेतल्यामुळे प्रशासन आणि महाराष्ट्रातील सरकारची निश्चितच गोची झालेली आहे.

शासनाने या बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरच काहीतरी तोडणार तोडगा काढण्याची आवश्यकता आहे अन्यथा येणाऱ्या भविष्य काळामध्ये धनगर समाज पेटून रस्त्यावर उतरेल आणि उग्र स्वरूपाचे आंदोलने होतील याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल असा पवित्रा धनगर समाजातील तरुणांनी घेतलेला आहे.

यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांमध्ये अहमदपूर तालुक्यातील काही सरपंच व प्रामुख्याने दसवाडीचे सरपंच लखन घोडके ,शेणकुड टाकळगावचे सरपंच संग्राम नरवटे, सरपंच गंगाराम पोले, व तसेच माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगुंडे, रामतीर्थी सरपंच धुळगुंडे व पोलीस वाडीचे सरपंच पिराजी धुळगंडे, यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी राजीव राजू मुकणार बालाजी देवकते तुळशीदास देवकते अंतेश्वर तुडमे ,परशुराम सुरनर, गणेश नरवटे, सतीश नरवटे, अमर पोले, नाना नरवटे, आनंद देवकते, भरत पोले, बालाजी सुरणर,परशुराम सुरनर, पत्रकार नंदराज पोले पाटील यांचा सह समाजातील तरुण मित्र तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!