Disha Shakti

शिक्षण विषयी

राहुरी तालुका शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी राणीताई साळवे यांची निवड

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुका शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळ त्रैवार्षिक अधिवेशन मेळावा पार पडला. यावेळी राहुरी तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटुंबे आखाडा शाळेतील उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका श्रीमती राणीताई गुलाबराव साळवे यांची महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली. त्याबद्दल संपूर्ण शाळेच्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने साळवे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

या निवडी प्रसंगी साळवे मॅडमचा सत्कार करताना जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन श्री संदीपजी मोटे सर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा विद्युलता आढाव मॅडम, संगमनेर शाखेच्या संचालिका श्रीमती लतिका घुले, श्रीरामपूर शाखेच्या संचालिका मिनाज शेख आणि श्री मंगेशजी पंडीत सर व केशव गायकवाड सर, बोलके मॅडम तसेच जिल्हा भरातून आदि मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!