Disha Shakti

शिक्षण विषयी

विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी पृथ्वीराज कारंडे कुस्तीत पुणे जिल्हात दुसरा

Spread the love

इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित जिल्हास्तरीय 17 वर्ष कुस्ती स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा संकुल वडकी ता.हवेली जि.पुणे येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कुल भिगवण चा विद्यार्थी पै. पृथ्वीराज शिवाजी कारंडे याने 60 किलो वजनगटात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कुल चे अध्यक्ष श्री.बापूराव थोरात सचिव श्री.विजयभैय्या थोरात यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्या सौ.वंदना थोरात व क्रिडा शिक्षक गणेश घुले यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्राचा खेळ म्हणून जगात प्रसिद्ध असलेली कुस्ती. पृथ्वीराज शिवाजी कारंडे हा मदनवाडी येथील शेतकरी कुठुबातील आहे कुस्तीची त्याला आवड होती त्याला जोड लाभली ती विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कुलचे क्रिडा शिक्षक घुले सर यांचे योग्य मार्गदर्शन त्याच प्रमाणे त्यांच्या या प्रयत्नांना विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कुल भिगवण स्कूलने योग्य साथ दिली आणि याच संधीचे सोने करत पृथ्वीराज शिवाजी कारंडे याने पुणे जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवून निवड सार्थ ठरवली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!