बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : भारतीय जनता पार्टी बिलोली तालुका अध्यक्षपदी जयराम आंबेकर विद्यालय अर्जापूरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आंतरभारती शिक्षण संस्था बिलोली चे सचिव, शिवसाई सेवाभावी संस्था आदमपूर चे माजी अध्यक्ष विघमान कोषाध्यक्ष, महात्मा बसवेश्वर शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था बिलोलीचे चेअरमन, नांदेड जिल्हा मुख्याध्यापक संघ नांदेड चे कार्याध्यक्ष, मल्लिकार्जुन शिक्षण संस्था लालवाडी चे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती माजी अध्यक्ष सावळी तसेच नांदेड जिल्हा शिक्षक मंडळ नांदेड चे सहसचिव, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध पदे भूषवलेले तसेच उच्च विद्या विभूषित सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यकरत असलेले चंद्रशेखर संतुकराव पाटील सावळीकर यांची भारतीय जनता पार्टी बिलोली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्याबद्दल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष डाॅ.संतुकराव हंबर्डे , डाॅ.अजित गोपछडे प्रदेश उपाध्यक्ष,आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार सुभाषराव साबणे,गंगाधरराव जोशी संघटनमंत्री, लक्ष्मण ठक्करवाड मा.जि.प.सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहे.पुढील काळात सर्व समावेशक कार्यकर्त्यांना सामावून घेऊन पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्नशील राहील असे चंद्रशेखर पाटील यांनी दिशा शक्ति न्यूजशी बोलताना सांगितले. समस्त सावळी ग्रामस्थांचा वतीने भारतीय जनता पार्टी च्या विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने चंदू पाटील सावळीकर यांचे निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Leave a reply