प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगाधरवाडी वावरथ येथील शिक्षक श्री अनिल शंकरराव विधाते यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून बी.जे.पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक अनिल विधाते सर यांना १० सप्टेंबर २०२३ रोजी कालिदास कलामंदिर नाशिक येथे देण्यात आला.
विधाते सर हे मुळगाव राहुरी तालुक्यातील मानोरी गाव येथील असुन 2016 पासून ते वावरथ जांभळी या मुळाधरण परिसरातील गंगाधरवाडी या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या 7 वर्षापासून ते आपले कार्य पार पाडण्यासाठी अवघड क्षेत्रात मुळाधरणातून लॉंच या बोटीद्वारे प्रवास करतात. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात तसेच मुळा धरणापलीकडील नऊ शाळांचा सर्व प्रशासकीय कारभार ते चांगल्या प्रकारे सांभाळतात.
राहुरी पंचायत समिती शैक्षणिक विभागाला सरांचे भरपूर सहकार्य होत असते. विधाते सर प्रहार या शैक्षणिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष असून शैक्षणिक, सामाजिक तसेच ब्रम्हाकुमारीज या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य आहेत.कलाकुंज शिक्षक रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाल्याने संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. राज नगरकर, सिनेअभिनेत्री स्मिता प्रभू, डॉ.महेंद्र देशपांडे , राजे लखुजी जाधव यांचे वंशज राजे चंद्रशेन जाधवराव देशमुख, खासदार भारतीताई पवार यांचे स्वीय सहाय्यक श्री दीक्षित साहेब उपस्थित होते.
बी.जे. पत्रकार संघाच्यावतीने शिक्षक श्री.अनिल विधाते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

0Share
Leave a reply