Disha Shakti

राजकीय

महसूलमंत्री नाम.राधाकृष्ण विखे यांच्या शुभहस्ते शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शुभारंभ

Spread the love

प्रतिनिधी / नाना जोशी : शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शुभारंभ आज महसूलमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते व खासदार मा.श्री. सदाशिवजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

यावेळी खासदार मा.डॉ. सुजयजी विखे, महानंदाचे  अध्यक्ष श्री. राजेशजी परजणे, संचालक श्री. राजेंद्रबापू जाधव, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, गौतम सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेबजी कोते, अपर मुख्य सचिव श्री. राजगोपालजी देवरा, विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्णजी गमे, जिल्हाधिकारी श्री. सिद्धारामजी सालीमठ, अपर जिल्हाधिकारी श्री. सुहासजी मापारी, श्री. बाळासाहेबजी कोळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. श्रीनिवासजी वर्पे आदींसह शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!