राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष झाली. मात्र, दिव्यांगाच्या बाबतीत एकाही लोकप्रतिनिधींनी विचार केला नाही. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एकमेव असे नेते आहेत, ज्यांनी दिव्यांगांच्या बाबतीत विचार करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी संकल्पना मांडली. याच संकल्पनेतून या बांधवांना साधन साहित्याचे वाटप करण्यात येत आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील म्हणाले राहुरी येथे दिव्यांगाच्या साधन साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आदी उपस्थित हाेते. विखे पाटील म्हणाले, ”मागील नऊ वर्षांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या. याशिवाय दिव्यांगांना समाजात सन्मानाने जगता यावे, स्वयंपूर्ण होता यावे, यासाठी त्यांनी साधन साहित्य देण्याची संकल्पना मांडली. याच संकल्पनेतून दिव्यांगाना या साधन साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
HomeUncategorizedनरेंद्र मोदी हे दिव्यांगाच्या बाबतीत विचार करणारे पहिले पंतप्रधान : सुजय विखे पाटील
Leave a reply