Disha Shakti

सामाजिक

आयुष्यमान भव: अभियानाचा देगलूर उपजिल्हा रुग्णालयात शुभारंभ

Spread the love

देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सूरनर : आज राज्यस्तरीय अभियान शुभारंभ सह देगलूर उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भव : अभियानाचा शुभारंभ सोहळा आमदार जितेश भाऊ अंतापुरकर नवयुवक वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्या हस्ते संपन्न झाला. अभियानाची सुरुवात डॉक्टर सुनील जाधव यांनी राष्ट्रगीत गायन करून झाली. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या काळात रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, आयुष्मान मेळावा बालक व तरुण आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमयुक्त हे अभियान राबवण्यात येत आहे.

 

यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी सुंदर बोन्दर, डॉक्टर अनिल थडके, डॉक्टर मलशेठवार विश्वनाथ, डॉक्टर संभाजी पाटील, डॉक्टर अश्विन पाटील , डॉक्टर अश्विनी गऊळकर, डॉक्टर उस्मान, डॉक्टर पाटील, डॉक्टर मिलिंद शिकारे, डॉक्टर मोना, डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर संजय लाडके, डॉक्टर मुजीब, डॉक्टर इंगळे संजय, मनीषा बोईनवाड सिस्टर, छाया पाटील, अभिजीत दामेकर, दीपक सूर्यवाडसह सर्व कर्मचारी सिस्टर्स उपस्थित होते. अवयव दानाची प्रतिद्वन्या देण्यात आली. प्रस्तावित डॉक्टर नरेश देवणीकर यांनी केले. सूत्रसंचालन संजय लाडके यांनी तर आभार डॉक्टर मुजीबी यांनी मानले. गाईडलाईन नुसार डॉक्टर सुनील जाधव यांनी राष्ट्रगीत गायन करून अभियान शुभारंभ सोहळ्याची सांगता करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!