प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : शिर्डी मतदार संघाचे मा.खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावतीने मा.खासदार भाऊसाहेब वाघचौरे मित्र मंडळ यांनी जिल्हास्तरीय हस्ताक्षर, वकृत्व व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी ऑनलाइन जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये चणेगाव येथील संस्कृती बाळासाहेब शेळके या विद्यार्थिनीने अहमदनगर जिल्हा स्तरावर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला असून दि.19 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे मा.खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या उपस्थित विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे.
हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात कु.संस्कृती बाळासाहेब शेळके हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून ही तरुणी श्री.रामेश्वर विद्यालय चणेगाव येथे इयत्ता 8 वी मध्ये सद्या शिक्षण घेत असून तिच्या या यशामध्ये तिचे विद्यालयातील शिक्षिका वाळेकर मॅडम व सर्व शिक्षक वृंद व आई प्रमिला शेळके व बाळासाहेब (प्रकाश) शेळके यांचे वेळोवळी मार्गदर्शन लाभल्याने हे यश प्राप्त झाल्याचे तिने यावेळी सांगितले संस्कृती शेळके हिच्या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून चणेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नातेवाईकांकडून संस्कृतीचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Leave a reply