Disha Shakti

क्राईम

सात्रळ येथील शिक्षकाच्या घरावर दरोडा ! दागिन्यांसह रोख रक्कम चोरी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी /  ज्ञानेश्वर सूरशे :  राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील गिते मळ्यातील शिक्षकाच्या घरी दरोडा पडला. शुक्रवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सुदर्शन गीते यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असे मिळून दिड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेने सोनगाव, सात्रळ पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.याबाबत राहुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सात्रळ – इरिगेशन बंगला रस्त्यावरील गीते मळा येथे शिक्षक गीते राहतात. ते सात्रळ येथील रयत संकुलात शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री १० वाजता पत्नी प्रियंका, आई सुनीता यांच्यासह जेवन करून गीते झोपी गेले. रात्री एक वाजता किचनच्या दरवाज्याची कडी कोंडा तोडून सहा जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.

या आवाजाने गीते उठले. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांची आई व पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल व इतर असा एकूण अंदाजे दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पळून गेले आहेत. दरोडेखोर गेल्यावर गीते कुटुंबीयांनी घडलेला प्रकार आजूबाजूच्या नागरिकांना सांगितला. ग्रामस्थांनी तात्काळ राहुरी पोलिसांना फोन केला. घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

आजूबाजूच्या परिसराची नाकी बंदी केली. काल दिवसभरात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी बसवराज शिवपुंजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सुदर्शन विट्ठल गीते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ६ दरोडेखोरावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!