Disha Shakti

सामाजिक

चौंडी येथील उपोषणकर्त्यांची सरकारने दखल न घेतल्यास 20 सप्टेंबरला धनगर बांधवांचा राहुरीत रास्ता रोको

Spread the love

राहुरी प्रतिनिधी /  ज्ञानेश्वर सूरशे : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गेली 11 दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज दि. 17 सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान,राहुरी यांच्यावतीने अहिल्याभवन येथे समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये चौंडी येथील उपोषणकर्त्यांची राज्य सरकारने दखल न घेतल्यास उपोषणकर्त्यांच्या पाठिंब्यासाठी व सरकारला धनगर समाजाच्या आरक्षणाची दखल घेण्यासाठी 20 सप्टेंबरला राहुरी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्यावतीने राहुरीत रास्ता रोको करण्याचा निर्णय सर्वानुमते मीटिंगमध्ये घेण्यात आला आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे युवा नेते चिंचोली ग्रामपंचायत सदस्य मा.सर्जेराव लाटे होते. यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती मा.आण्णासाहेब बाचकर, अवधूत पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सोमनाथ देवकाते, मार्केट कमिटीचे माजी संचालक कैलास केसकर, लक्ष्मण बरे, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सदस्य भारत मतकर, पुण्यश्लोक पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय खेडेकर, युवा नेते विशाल बाहुले,एम.पी सोसायटीचे मा.चेअरमन संदीप तमनर, सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ तमनर, कैलास बरे, संतोष झडे, यशवंत सेना तालुकाप्रमुख रामा बाचकर ,बाबासाहेब शेंडगे, प्रा.अण्णासाहेब गडधे आधी समाज बांधव उपस्थित होते तसेच उपस्थित सर्व समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करून चोंडी येथील उपोषणास आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

याप्रसंगी सर्व उपस्थित समाज बांधवांचे स्वागत व आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.विजुभाऊ तमनर यांनी व्यक्त करुन 20 सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारने चौंडी येथील उपोषणकर्त्यांची योग्य दखल घेऊन योग्य निर्णय न घेतल्यास सर्व समाज बांधवांनी 20 सप्टेंबर रोजी राहुरी येथे रास्ता रोको साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!