दौंड प्रतिनिधी किरण थोरात
दौंड पारगाव येथील एटीएम मशीन स्पॉटकाच्या साहाय्याने उडवून चोरी करणाऱ्या तीन आरोपीना यवत पोलिसांनी अटक केली व त्यांच्या वरती यवत पोलीस स्टेशन येथे गु र नं 468/23 भा द वि.379, 511,427, 34. सह् स्फोटक पदार्थ अधिनियम कायदा 1908 कलम 4 अन्वये गुन्हा दाखल असून सदरच्या गंभीर गुन्ह्याचा तपास मा. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांचे सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा अविनाश शिळीमकर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांमार्फत करण्यात येत होता. आज रोजी तपास दरम्यान सदरच्या गुन्ह्यातील आरोपी 1) विशाल छबु पल्हारे वय-20 वर्ष रा. हांगेवाडी ता. श्रीगोंदा जि. नगर याने व त्याचे इतर साथीदार नामे 2) आदित्य प्रदीप रोकडे वय- 20 रा. चिंचणी ता. शिरूर जि.पुणे 3)अनिकेत संजय शिंदे वय -20 रा. बोरी ता. श्रीगोंदा जि. नगर . 4) आदित्य खोमणे रा मांडवगण
फराटा ता. शिरूर जि. पुणे. यांचे मदतीने केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर 3 आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली
असता त्यांनी एकूण तीन वेळा पारगाव येथील एटीएम मशीन स्फोटक पदार्थाच्या सहाय्याने उडवून देऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली असून वरील आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून यवत पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर आरोपीकडुन रेकॉर्ड प्रमाणे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री स्वप्निल जाधव सर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे व.पो.नि अविनाश शिळीमकर सो, पो. नि. हेमंत शेडगे, सपोनी राहुल गावडे पोसई गणेश जगदाळे, स. फौ तुषार पांधारे, पो हवा सचिन घाडगे, जनार्दन शेळके, आसिफ शेख,योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे यांनी केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास यवत पो. स्टे. करीत आहेत.
दौंड पारगाव येथील एटीएम मशीन स्पॉटकाच्या साहाय्याने उडवून चोरी करणाऱ्या तीन आरोपीना यवत पोलिसांनी केली अटक..

0Share
Leave a reply