राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज होऊन हजारो लिटर पाणी रस्त्यावर जात असून याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सदरील पाईपलाईन तीन दिवसांपासून लिकेज होऊन हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असताना देखील आत्तापर्यंत या लिक झालेल्या पाईपलाईन कडे ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी कानाडोळा केल्याचे निदर्शनास येत असून तीन दिवसांत याबाबत कोणतीच उपाययोजना ग्रामपंचायतचे न केल्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून चालले आहे.
ग्रामस्थांना ग्रामपंचायतकडून मुबलक पाणी पुरवठा होत नाही तसेच दोन ते दिन दिवसांनी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते त्यात यावेळी पावसाने चकवा दिला असता सद्या दुष्काळस्थिती निर्माण झालेली असताना राहुरी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत गोटुंबे आखाडा या गावात जर पिण्याचे पाण्याचे हाल असताना जर हजारो लिटर पाणी रस्त्यावर जात असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
Leave a reply